• Download App
    पुण्यातील तरुणीला ‘रॉ’ ची भिती दाखवून १० लाखांना गंडा ; बारामतीच्या तरुणाला बेड्या Baramati Man dupes Pune Girl of 10 lacks by threatening in name of RAW agency

    पुण्यातील तरुणीला ‘रॉ’ ची भिती दाखवून १० लाखांना गंडा ; बारामतीच्या तरुणाला बेड्या

    वृत्तसंस्था

    पुणे : अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी तरुणाने केली. तसेच ‘रॉ’ या तपास संस्थेची तुझ्यावर नजर असल्याची भीती दाखवून तरुणीकडून १० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती येथील ३० वर्षांच्या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे.Baramati Man dupes Pune Girl of 10 lacks by threatening in name of RAW agency



    या प्रकरणी २८ वर्षीय धनश्री हासे या तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ३० वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण ,असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात बारामती एमआयडीसी परिसरात राहतो.

    एका सोशल नेटवर्किंग साईटवर आरोपी आणि फिर्यादी तरुणी या दोघांची ओळख झाली होती. त्याने एप्रिल ते ७ जुलै दरम्यान ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून त्याने तरुणीकडून १० लाख रउकळले. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले.

    Baramati Man dupes Pune Girl of 10 lacks by threatening in name of RAW agency

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस