विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बप्पी यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Bappi Lahiri admits in hospital
बप्पीदांच्या टीमकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. बप्पी यांची मुलगी रेमा बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सर्व प्रकारची काळजी घेतली होती, मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली.
वाढत्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बप्पी लाहिरी यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.देशात सध्या कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यातही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.