• Download App
    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बाहेरच्या नागरिकांना बंदी ; कोरोनाला रोखण्यासाठी उपाय।Ban on outsiders in housing societies in Pune; Measures to prevent corona

    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बाहेरच्या नागरिकांना बंदी ; कोरोनाला रोखण्यासाठी उपाय

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यात बाहेरच्या नागरिकांना बंदी घातली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय केला आहे. Ban on outsiders in housing societies in Pune; Measures to prevent corona

    सोसायटीत येणाऱ्या प्रत्येक कामगाराची कोरोना चाचणी आवश्यक आहे. बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी, असा फलक प्रवेशद्वारावरच लावावा. लसीकरण करून घ्यावे. पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर होईल. त्याबाबतच्या नियमांचे पालन करावे. नियम तोडणाऱ्या सोसायटीला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.



    मुख्य प्रवेशद्वारावरच पार्सल द्यावे

    घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्सल द्यावे. ते पार्सल सोसायटीतील कर्मचाऱ्यामार्फत संबंधितांना पोचवावे, असे आदेश दिले आहेत.

    सोसायटीतही फिरण्यावर प्रतिबंध 

    सोसायटीतील जिम, स्वीमिंग पूल आणि क्लब हाउस वापरण्यास प्रतिबंध आहे. एक मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना उद्यान, आवारातही फिरण्यावर बंदी आहे.

    Ban on outsiders in housing societies in Pune; Measures to prevent corona

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना