• Download App
    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात|Balasaheb Thackeray slapped manishankar aiyer with chappal for insulting savarkar, but Uddhav Thackeray betrayed Hindutva, targets eknath shinde

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

    प्रतिनिधी

    खेड/रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून गप्प बसलात. तिथेच तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केलीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडची सभा जिंकली.Balasaheb Thackeray slapped manishankar aiyer with chappal for insulting savarkar, but Uddhav Thackeray betrayed Hindutva, targets eknath shinde

    ज्या खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरेंची 5 मार्चला सभा झाली होती, त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची देखील सभा झाली. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा शिंदेंच्या सभेला जास्त गर्दी होती. या सभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, की त्यांच्याकडे फक्त खोके आणि गद्दार दोनच शब्द आहेत. पण खरी गद्दारी तर त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला बाळासाहेब ठाकरे यांनी चपलेने मारले होते. पण राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात आणि तो अपमान उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प राहून सहन करतात. हीच त्यांची हिंदुत्वाशी गद्दारी आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे. उद्धव ठाकरे वारंवार सांगतात, की बाळासाहेब माझे वडील होते. ते बरोबरच आहे. ते त्यांचे वडील होते. पण बाळासाहेब आम्हा सगळ्या शिवसैनिकांचे दैवत आहेत. बाळासाहेबांनी आमच्या रक्तामध्ये नसानसामध्ये हिंदुत्व भिनवले आहे आणि म्हणून आम्ही हिंदुत्वाचा आणि सावरकरांचा अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही उठाव करून बाहेर पडलो आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे सरकार स्थापन केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.



    गजानन कीर्तीकर यांचे टीकास्त्र

    उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा विचार केला तेव्हाच हिंदुत्व राष्ट्रीयत्त्व पुसले गेल्याची टीका गजानन कीर्तिकर यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली होती अशी टीकाही गजानन कीर्तिकर यांनी केली.

    गजानन कीर्तिकर यांनी टीका करताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला आहे. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांचा गौरव करत शिवसेनेचा आताचा चाललेला प्रवासच खरा शिवसेनेचा प्रवास चालू आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी केली त्यावेळीच खऱ्या शिवसेनेचा प्रवास चालू झाला असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत मराठी माणसाला किंमत आली त्याच प्रमाणे कोकणातील माणसालाही खरी किंमत शिवसेनेमुळे मिळाली असल्याचेही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.

    मराठी माणसांचा सर्वांगीण विकास व्हावा, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये जिल्ह्यातून आलेल्या तरुण शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर धडपडत होते, मात्र ही सगळी तळमळ शिवसेना ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेली त्याचवेळी शिवसेना संपली, असे टीकास्त्र कीर्तिकर यांनी सोडले.

    शिवसेनेचा प्रवास हा राष्ट्रवादीच्या अंगाने चालू झाला होता, त्यावेळी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांनीही तशा सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही शिवसेनेचा राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रवास थांबला नसल्यानेच शिवसेनेची आक्रमकता संपून गेल्याची टीका गजानन कीर्तिकर यांनी केली.

    Balasaheb Thackeray slapped manishankar aiyer with chappal for insulting savarkar, but Uddhav Thackeray betrayed Hindutva, targets eknath shinde

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस