विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना मंदिरे, मशिदी, आणि चर्चमध्ये नेऊन शपथविधी कार्यक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ काँग्रेसने या उमेदवारांना दिली आहे. Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली आहे. आमदारांच्या पक्षांतरासाठी जनता देखील थोडी जबाबदार आहे. कारण ते पक्षांतर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करून आमदार करत असतात. अशावेळी पक्षांतर करणाऱ्या आमदाराला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी तुडवा, असे आदेश बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली आहे.
पक्षांतर करणाऱ्या आमदारांना भररस्त्यात तुडविण्याची बाळासाहेबांची ही आठवण सांगून संजय राऊत यांनी काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची एक प्रकारे खिल्ली उडवली आहे.
Balasaheb had said, “Gayaram” MLAs should be trampled in the streets !!: Sanjay Raut mocked the swearing in of Congress candidates
महत्त्वाच्या बातम्या
- 370 कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये 1700 काश्मिरी पंडितांना सरकारी नोकरी!!
- गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??
- समाजवादी पक्ष म्हणजे सडलेला माल, कयामतच्या दिवसापर्यंत सत्तेवर येणार नाही, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाची बोटे तुपात; महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ
- देशातील तीन कोटी लोकांना लखपती कसे बनविले, पंतप्रधानांनी सांगितला मार्ग
- गलवानवर मोठा खुलासा : चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले, मात्र केला फक्त ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा