• Download App
    3 वर्षांनंतर डीएसकेंना जामीन : मुख्य गुन्ह्यातील जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात 26 जुलैला सुनावणीची शक्यता|Bail for DSK after 3 years Supreme Court likely to hear bail application in main crime on July 26

    3 वर्षांनंतर डीएसकेंना जामीन : मुख्य गुन्ह्यातील जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात 26 जुलैला सुनावणीची शक्यता

    प्रतिनिधी

    पुणे : सदनिका विकत घेतलेल्या नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सत्र न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी हा आदेश दिला.याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.Bail for DSK after 3 years Supreme Court likely to hear bail application in main crime on July 26

    डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा देण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्ह्यात डीएसके आणि इतर आरोपी १७ फेब्रुवारी २०१८ पासून तुरुंगात आहेत.



    या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव व अॅड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. मुख्य गुन्ह्यातील जामिनासाठी डीएसके यांनी अर्ज केला आहे. हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर २६ जुलै रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे.

    Bail for DSK after 3 years Supreme Court likely to hear bail application in main crime on July 26

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस