वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहिती प्राथमिक स्तरावर हाती आली आहेAURANGABAD: Big news: ED raids in Aurangabad; two industrialists targeted – raids at seven places
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद:महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून बडे नेते आणि उद्योजकांविरोधात ईडीचे धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारले आहेत.
दुपारी 12 वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु असून लवकरच यातील अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून उघड केली जाईल.
सात ठिकाणी धाडसत्र, दोन बड्या उद्योजकाविरोधात कारवाई
शहरातील विविध सात स्थळांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यात नक्षत्रवाडी परिसराचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. वक्फ बोर्ड जमिनीसंदर्भात ही धाड पडल्याची माहिती प्राथमिक स्तरावर हाती आली आहे.मात्र कोणत्या दोन उद्योजकांविरोधात ही कारवाई सुरु आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
AURANGABAD: Big news: ED raids in Aurangabad; two industrialists targeted – raids at seven places
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल