• Download App
    मुंबईत रामनवमी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी, जोरदार दगडफेक, पाहा PHOTOS|Attempt to spoil Ramnavami festival in Mumbai, clash between two groups during procession, heavy stone pelting, see PHOTOS

    मुंबईत रामनवमी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी, जोरदार दगडफेक, पाहा PHOTOS

    वृत्तसंस्था

    मुंबई : दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभा यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन्ही गट समोरासमोर आले. यानंतर दगडफेक झाल्याचे शोभा यात्रेच्या आयोजकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. स्थानिक लोकांनीही जमाव पांगवण्यात मदत केली.Attempt to spoil Ramnavami festival in Mumbai, clash between two groups during procession, heavy stone pelting, see PHOTOS

    भाजप नेत्याचा पोलीस ठाण्याला घेराव

    भाजप नेत्यांनी मालवणी पोलीस ठाण्याचा घेरावही केला. भाजप नेत्यांनी अनेक जखमी तरुणांना त्यांच्या मेडिकल रिपोर्ट्ससह पोलीस ठाण्यात हजर केले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनेनंतर दगडफेक आणि हाणामारीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. मुंबईतील मालाडमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेला गोंधळ यात स्पष्ट दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओही आहे. व्हिडिओमध्ये दगडफेक करणारे कैद झाले आहेत. मालाडच्या मालवणी भागातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.



    किती जण जखमी झाले?

    याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. माहिती देताना डीसीपी म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकीत काही अज्ञात लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली पण आम्ही लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेत एक जण जखमी झाला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

    Attempt to spoil Ramnavami festival in Mumbai, clash between two groups during procession, heavy stone pelting, see PHOTOS

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट