विशेष प्रतिनिधी
सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयात ‘मानवी कवटी’ आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. At Satara Hospital ‘Human skull’ found
‘मानवी कवटी’ ही बाब गंभीर असून देखील या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी या घटनेबाबत हात झटकले आहेत, असा आरोप मोरे यांचा आहे. पोलिस यंत्रणा आणि सिव्हिल प्रशासन हातात हात घालून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली. जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- सातारा रुग्णालयात ‘मानवी कवटी’
- जिल्ह्यात खळबळ उडाली होती
- प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत
- चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी हात झटकले
- सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा आरोप
At Satara Hospital ‘Human skull’ found
महत्त्वाच्या बातम्या
- टॉप-३ आईटी कंपन्या नफ्यात; १८ हजार कोटी रुपयांचा फायदा; ५० हजार जणांना नोकऱ्या
- महिलांच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या 18 खेळाडूंच्या संघाची निवड , सविता पूनियाची कर्णधारपदी नियुक्ती
- डॉ. सुदाम मुंडेला कठोर शिक्षा झाली असती तर आर्वीची घटना घडलीच नसती; सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गुरव यांचा दावा