वृत्तसंस्था
सिंहगड : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं तुम्हीही वाचलं नसेल, तेवढं मी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, असे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.As much as you may not have read about Shivaji Maharaj, I have read 50 years ago: Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सिंहगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्याविषयी आदर व्यक्त केला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पुण्यातील सिंहगडाला भेट दिली. सिंहगडावर स्वागत झाल्यानंतर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत.”
शिवाजी महाराज भारताचेच नाही, जगाचे हिरो!
“भारतात छत्रपती शिवाजी महाराज एका नव्या अवताराच्या रुपात आले. मोघल साम्राज्याचा अंत करण्यात आणि भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांनी ज्या बुद्धी, युक्ती आणि शक्तीचा वापर केला आणि राज्य केलं, त्याद्वारे एक प्रकारे एक नवी चेतना देशात जागृत केली. त्यामुळे शिवाजी महाराज हे फक्त भारताचेच नाही, तर जगाचे हिरो बनले आहेत.
जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे”, असं राज्यपाल यावेळी म्हणाले.दरम्यान, यावेळी राज्यपालांनी आपण शिवाजी महाराजांबद्दल ५० वर्षांपूर्वी वाचन केल्याचं सांगितलं. “मी तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे या सगळ्यांविषयी ५० वर्षांपूर्वी वाचलं आहे, जेवढं तुम्ही देखील वाचलं नसेल. कारण शिवाजी हे आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत”
असं ते माध्यम प्रतिनिधींना उद्देशून म्हणाले. “शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे नायक आहेत. देशातील मुलांना सुरुवातीपासूनच शिवाजी महाराजांविषयी, तानाजी मालुसरेंविषयी शिकवलं जायला हवं. असं झालं, तर आपल्या देशातील मुलं देखील तानाजी मालुसरे होऊ शकतील, शिवाजी होऊ शकतील”, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
As much as you may not have read about Shivaji Maharaj, I have read 50 years ago: Governor Bhagat Singh Koshyari
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले