आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे.Aryan khan drugs case: Sameer Wankhede demands security from Mumbai police
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने ड्रग्स तस्करी आणि बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन सर्वांसमोर आले. एनसीबीच्या टीमने अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेक बड्या सेलिब्रेटींना अटक केली. यामध्ये एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे.
अशातच आता आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे.
क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.
या दाव्यानंतर आता एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशीसह त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे अडचणीत आल्याचे दिसत आहे.
याबाबत एनसीबीकडून आता प्रसिध्दीपत्रक देण्यात आले आहे.तसेच यासंबंधीच्या आरोपाच्या तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांनी घेतला आहे. तयामुळे आता समीर वानखेडे यांनी यावर मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहित त्यांच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या या प्रतिक्रियांचं भांडवल करत सुरक्षेची मागणी केली आहे.
‘मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात. असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला.
Aryan khan drugs case: Sameer Wankhede demands security from Mumbai police
महत्त्वाच्या बातम्या
- चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू
- कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न
- आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा , शाहरुख खानला दिला सल्ला ; राज्यमंत्री रामदास आठवले –
- साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्याजवळ एसटी बस भस्मसात, प्रवासी सुखरूप
- वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण