विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील पुणे जिल्हा परिषदेसह २५ जिल्हा परिषदांची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी( CEO) यांची तर पंचायत समित्यांवर गट विकास अधिकारी (BDO) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. Appointment of CEOs as Administrators on Zilla Parishads
जिल्हा परिषदेचा कार्यकाल २० मार्च रोजी तर पंचायत समितीचा कार्यकाल १३ मार्च रोजी समाप्त होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले. त्यातच राज्य शासनाने सहा महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी या निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
ओबीसी आरक्षण पेचामुळे मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मुदतीत न होण्याची शक्यता बळावली. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुंबई महापालिके सह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक व सोलापूर या दहा महानगरपालिकांची मुदत मार्चमध्ये संपत आहे. त्यांच्यावर सुध्दा प्रशासक नियुक्त केले जातील.
Appointment of CEOs as Administrators on Zilla Parishads
महत्त्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh – Parambir Singh : देशमुखांवरची केस मागे घेण्यासाठी परमवीर सिंगांवर दबाव?; मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सीबीआय चौकशी!!
- मुंबईकरांसाठी GOOD NEWS! पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही !पोलीस आयुक्त संजय पांडे यांची घोषणा
- Fadanavis – NCP – Raut : पोलीस चौकशी विषयी फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी – राऊत बचावात्मक पवित्र्यात!!
- Pawar – ED – Fadanavis – police : पवार जसे ईडीकडे जाणार होते… तसे फडणवीस उद्या पोलिसांत जाताहेत!!