प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे आणि चिंचवडमधील शाईफेक प्रकरणातील कारवाया मागे घेण्याच्या सूचना केल्या आहे. प्रसिद्धीपत्रक काढत त्यांनी या सूचना केल्या आहेत. Apology to Chandrakantada Patil again
सगळ्यांवरील कारवाया मागे घ्या
घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी तक्रार नाही. ज्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले, पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवरची निलंबनाची कारवाई केली होती आणि ज्या पत्रकारावरदेखील कारवाई केली त्या सगळ्यांवरच्या कारवाया मागे घ्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे. तोंडावर शाईफेक झालेल्या प्रकरणावर काहीही मत नाही. या वादावर मी पडदा टाकत आहे. त्यामुळे हा वाद थांबवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पुन्हा एकदा माफी मागतो
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मी कायम मान राखत आलो आहेत. त्यांच्या कार्याचे अनुकरण केले आहे. त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. त्यांच्या विषयी बोलताना भाषणात बोली भाषेतील शब्द अनावधानाने निघाले. यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. या प्रकाराबाबत या आधीही दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यावरून घडलेल्या घटना मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले याचे वाईट वाटते. या मुद्द्यांवरुन महाराष्ट्र अशांत होऊ नये. या सगळ्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
Apology to Chandrakantada Patil again
महत्वाच्या बातम्या