प्रतिनिधी
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासंबंधीच्या बऱ्याच आतल्या बातम्या आता उघड होऊन सोशल मीडियावर फिरायला लागल्यात. नारायण राणेंना अटक करून भाजपला धडा शिकविण्याची आयडिया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याची बातमीही त्यातून फिरते आहे. Anil Parab (Maharashtra Minister) is behind the arrest of Narayan Rane. We demand a CBI inquiry into the arrest and the entire procedure of action
असे असताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र आपल्या निशाण्यावर परिवहन मंत्री अनिल परबांना घेतले आहे. अनिल परबांचा रत्नागिरीतल्या व्हायरल विडिओवरून भाजपचे नेते आमदार आशिश शेलारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप सर्वांनी पाहिली आहे. यातून दिसत आहे की अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे आशिश शेलारांनी सांगितले.
नारायण राणेंना मधुमेह असताना जेवण करुन दिले नाही, त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ठाकरे सरकारची ही तालिबानी मानसिकता आहे. सुरुवात तुम्ही केली आणि आता शेवट आम्ही करु असा इशाराच यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वातंत्र्य दिनाचे अज्ञान कसे लपवायचे याचा हा थयथयाट आहे. हिरक महोत्सव की अमृतमहोत्सव अशी स्वातंत्र्य दिनाबाबत विचारणा करणे हाच देशाचा अपमान आहे. भाजप युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे, की मुख्यमंत्री महोदय हा देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव आहे.
संयमी असलेल्या शरद पवारांसोबत राहूनही शिवसेनेचे संकुचित राजकारण सुरू आहे, अशी मखलाशीही आशिष शेलार यांनी केली आहे.
Anil Parab (Maharashtra Minister) is behind the arrest of Narayan Rane.
We demand a CBI inquiry into the arrest and the entire procedure of action
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबचे झाले थोडे, तोच छत्तीसगडमधून आले “वादाचे घोडे”; मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध मंत्री टी. एस. सिंगदेव यांचे बंड
- दुबईमध्ये उघडेल आता जगातील सर्वात उंच ऑब्जर्वेशन व्हील , लंडन आयच्या उंचीपेक्षाही असेल दुप्पट
- अफगाणिस्तानच्या आयटी मंत्र्यांवर जर्मनीत पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, मंत्रिपदी असताना देशात सेल फोन नेटवर्क वाढवले
- केवळ ४००० अमेरिकी नागरिक आणायचे होते, मग २६,००० एअरलिफ्ट कसे केले? दहशतवादी तर आणले नाहीत ना? ट्रम्प यांची बायडेन सरकारवर कडाडून टीका