प्रतिनिधी
मुंबई – मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करण्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठाकरे – पवार सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगाकडून क्लिन चिट मिळण्याची शक्यता आहे.Anil Deshmukh 100 cr. extortion case – chandiwal commision may give clean chit to anil deshmukh, reports zee 24 taas
100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आता चांदिवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे देशमुखांना क्लिन चिट मिळणार, असल्याची माहिती समोर आली आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाकरे – पवार सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. २३ मार्चला सीलबंद अहवाल तयार होणार आहे. आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद केला आहे.
यामध्ये आलेले मुद्दे पुढील प्रमाणे –
१०० कोटी वसुलीची गंभीर घटना दोघांनीही स्टेशन डायरीत नोंदवली नाही. स्टेशन डायरी हे पोलिसांकरता महत्वाचे साधन आहे त्याचा वापर केला नाही.
सचिन वाझेने १०० कोटी वसुलीबाबत वरिष्ठांकडे कधीच लेखी तक्रार केली नाही.
परमबीर सिंग यांनी २० मार्च २०२१ च्या आधी पर्यंत कधीच १०० कोटी वसुलीबाबत पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली नाही. २० मार्चपूर्वी १०० कोटी वसुली प्रकरण सुरू होते त्याची कुठेही एफआयआर केली नाही.
१०० कोटींच्या वसूलीची कुठेही नोंद नाही
त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लिन चीट मिळण्याची दाट शक्यता आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे आरोप वैध नाहीत. सरकार दरबारी १०० कोटी वसुलीचे कुठेही आरोपाची नोंद नसल्याने अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकतो, असा निष्कर्ष या अहवालावरून काढला जात आहे. त्यामुळे आयोगाच्या अहवालानंतर अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळते का, हे पाहण्याचे ठरणार आहे.
Anil Deshmukh 100 cr. extortion case – chandiwal commision may give clean chit to anil deshmukh, reports zee 24 taas
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे मुख्यमंत्री बघेल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला अन् म्हणाले, फक्त हिंसा व अर्धसत्य दाखविले..!
- Fake Currency Racket : बनावट नोटा बँकेत भरणाऱ्या ओवैसींच्या एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खानला अटक
- भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर बरसल्या; आता रेल्वे मंत्रालयावरील टीका चर्चेत
- ED IT actions : ईडी – इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक