• Download App
    शिवसेनेशी आघाडी??; ठाण्यात राष्ट्रवादीतच बेदिली!! जितेंद्र आव्हाड - नजीब मुल्ला यांच्यातील बेबनाव समोर!!|Alliance with Shiv Sena ??; Disillusionment with NCP in Thane !! Jitendra Awhad - In front of the disagreement between Najeeb Mulla

    शिवसेनेशी आघाडी??; ठाण्यात राष्ट्रवादीतच बेदिली!! जितेंद्र आव्हाड – नजीब मुल्ला यांच्यातील बेबनाव समोर!!

    प्रतिनिधी

    ठाणे : ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचा परिणामकारक शिरकाव करण्यासाठी शिवसेनेशी आघाडी करण्यासाठी उत्सुक राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच पक्षाच्या गटनेत्यांनी धक्का दिला आहे.Alliance with Shiv Sena ??; Disillusionment with NCP in Thane !! Jitendra Awhad – In front of the disagreement between Najeeb Mulla

    शिवसेना आमच्या बरोबर आघाडी करायला तयार नसेल तर आम्ही स्वबळावर लढू, असे राष्ट्रवादीचे ठाणे महापालिकेतील गटनेते नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.महाविकासआघाडी तला आघाडी धर्म पाळण्याची फक्त राष्ट्रवादीची जबाबदारी नाही तर शिवसेनेचे सुद्धा आहे असे त्यांनी शिवसेना नेतृत्वाला सुनावले.



    मात्र त्यावरून लगेच जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव केली असून गटनेते नजीब मुल्ला हे अनवधानाने बोलले आहेत. ठाण्यामध्ये शिवसेनेशी आघाडी करण्यास संदर्भातल्या सर्व निर्णय मी घेणार आहे. कारण मीच ठाण्याचा पालकमंत्री आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

    ठाण्यामध्ये शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. आणि ते वर्षानुवर्षांचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादीशी आघाडी नको आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेना एकटी स्वबळावर निवडून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे.

    शिवसेना राष्ट्रवादीशी आघाडी करायला तयार नाही. उलट श्रेयवादावरून राष्ट्रवादीशी शिवसेनेचा उभा दावा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते ठाण्याच्या राजकारणात परिणामकारक शिरकाव करण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, यातून राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधील बेदिली समोर आली आहे.

    Alliance with Shiv Sena ??; Disillusionment with NCP in Thane !! Jitendra Awhad – In front of the disagreement between Najeeb Mulla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू

    Bombay HC : हायकोर्टाने म्हटले- रस्ता खराब असल्यास फक्त कंत्राटदार कंपनीवरच FIR का? PWD अधिकारी कसे सुटू शकतात?

    फडणवीस मंत्रिमंडळात फेरबदल झालाच, तर त्यात विरोधकांना credit किती??