• Download App
    पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याचं नाव बदलणार?; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी!Ajit Pawars request to Chief Minister and Deputy Chief Minister to rename Velhe taluka of Pune district as Rajgad

    पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचं नाव बदलणार?; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी!

    जाणून घ्या कोणता आहे तो तालुका आणि कोणतं नवीन नाव सूचवलं आहे?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना पत्र देखील पाठवले आहे. Ajit Pawars request to Chief Minister and Deputy Chief Minister to rename Velhe taluka of Pune district as Rajgad

    यासंदर्भात अजित पवार यांनी स्वत: ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. ‘’पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्रामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.’’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

    याशिवाय,’’प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे शासन चालवलं. त्यामुळे या किल्ल्याशी तमाम नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड करण्यात यावं, अशी नागरिकांची तीव्र इच्छा आहे. याबाबत तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे.’’ असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

    अजित पवारांनी आपल्या ट्वीटसोबत संबंधित मागणीचे पत्रही जोडले आहे. ज्यामध्ये ‘’वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील, किल्ले राजगड आणि किल्ले तोरणा असे दोन महत्त्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापि, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असल्याने तालुक्याचे नाव वेल्हे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांची भावना या राजगड किल्ल्याशी जुडलेली असून, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यातस्थित असल्याने किल्ले राजगडवरून या तालुक्याचे नामकरण राजगड करण्याबाबतच्या प्रस्तावावस मान्यता देण्यात यावी, ही विनंती.’’ असे म्हटले आहे.

    Ajit Pawars request to Chief Minister and Deputy Chief Minister to rename Velhe taluka of Pune district as Rajgad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस