‘’मी सुप्रियाशीही बोललो, तर सुप्रियाने…’’ असंही अजित पवारांनी जाहीर भाषणात सांगितल .
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘’सर्वच क्षेत्रात निवृत्तीचं वय ठरलं आहे. सर्वच लोक निवृत्त होत असतात. पण तुम्ही अजूनही निवृत्त होण्याचं नाव घेत नाही. तुम्ही आता निवृत्त व्हा, आराम करा, आम्हाला मार्गदर्शन करा, काही चुकलं तर आमचे कान पकडा. आम्ही दुरुस्त करू ना. पण तुम्ही थांबणार आहात की नाही?’’ असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. Ajit Pawars criticism of Sharad Pawar in NCP meeting
महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा मेळावा पार पडला. अजित पवारांनी मेळाव्यात बोलताना, उघडपणे मनातली खदखद बोलून दाखवली आणि शरद पवारांवरही निशाणा साधला.
याचबरोबर “मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत त्यांना काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? प्रत्येकवेळी मला का व्हिलन बनलं जातयं, का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?’’ असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.
‘’२०१७ साली शरद पवारांसाठी शिवसेना जातीयवादी होती, मग २०१९ ला मविसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजपा जातीयवादी झाला?’’असा प्रश्नही अजित पवारांनी शरद पवारांना विचारला आहे.
‘’आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजपा सत्तेवर आला आहे. २०१९ ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं. देशाला करीश्मा असणाऱ्या नेत्याची देशाला गरज आहे आणि ते नेते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. २०२४ मध्येही नरेंद्र मोदींचंच देशात सरकार येणार आहे.’’ असं म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे.
Ajit Pawars criticism of Sharad Pawar in NCP meeting
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही