प्रतिनिधी
मुंबई : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईला मुंबई कोर्टाने वैध ठरवली असून कारखान्याची मालमत्ता जप्त करणे योग्यच असल्याचे मत मुंबई कोर्टाने व्यक्त केले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला असून यांच्याविरुद्धच्या कारवाईत कोर्टाने अधिमान्यता दिल्याने ते राजकीय दृष्ट्याही अडचणीत आले आहेत.Ajit Pawar shocked in Jarandeshwar factory case; Mumbai court rules ED’s action for property confiscation valid
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना स्थापन केला होता कारखाना तोट्यात गेल्यानंतर गुरु कमोडिटीज नाही तो कारखाना खरेदी केला अजित पवारांचे नातेवाईक गुरु कमॉडिटीचे मालक आहेत.
अजित पवारांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यात 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई कोर्टाने ईडीची कारवाई वैध ठरवल्यामुळे आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्याचे मूळचे मालक असलेल्या 27 हजार सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात पुन्हा देण्यात यावा, अशी आम्ही ईडीला आणि कोर्टाला प्रार्थना करणार आहोत, असे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. या संदर्भातले ट्विट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केले आहे.
गुरु कमोडिटीज कडून खरेदी
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना खरेदी प्रकरणात गुरु कमोडिटीज या अजित पवारांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांच्या कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली होती. त्याला मुंबई कोर्टात आव्हान देण्यात आले होते. परंतु मुंबई कोर्टाने ईडीची कारवाई वैध असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजित पवार हे राजकीय दृष्ट्या देखील अडचणीत आले आहेत.
Ajit Pawar shocked in Jarandeshwar factory case; Mumbai court rules ED’s action for property confiscation valid
महत्त्वाच्या बातम्या
- बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग
- 370 Removal Impact : जम्मू काश्मीर मध्ये देशभरातील 34 लोकांची मालमत्ता खरेदी; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती!!
- Narayan Rane : ठाकरे – पवार सरकारची मुंबई हायकोर्टात माघार; पण सिंधुदुर्ग दौर्यात आदित्य ठाकरेंच्या राणेंवर तोंडी तोफा!!
- शहरातील आमदारांना माेठी विकासकामे करण्यासाठी निधी द्यावा – माधुरी मिसाळ