सध्या राज्यात दररोज १०हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे Ajit Pawar held an emergency meeting at the Ministry and took important decisions regarding lockdown
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.सध्या राज्यात दररोज १०हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार
१) राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता
२) शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता
३)राज्यात संध्याकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी आहे
४)दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता
५)राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध
६) आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी