विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखी खाली निधी वाटप केले. त्यानंतर अजितदादांनी राष्ट्रवादीच्याच आमदारांना झुकते माप दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा देखील केला. अजितदादांनी कोणाही आमदारांना झुकते माप दिलेले नाही. त्यांनी शिवसेना – भाजपाच्या आमदारांना देखील निधी दिला असे फडणवीस म्हणाले. पण अजितदादा यावेळी ठाकरे गटाच्या टीकेचे धनी झाले. Ajit Dada’s fund distribution under the supervision of Shinde – Fadnavis
अजित पवारांनी शिवसेनेतल्या शिंदे गटाचे आमदारांवर निधी वाटपात अन्याय केला, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.
सुमारे 4500 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी आमदारांना सुमारे 1500 कोटी रुपयांचा निधी वाटप केला. हे निधी वाटप अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखी खाली झाले. याआधी ठाकरे पवार सरकार मध्ये अजितदादांना अर्थमंत्री म्हणून “मुक्तद्वार” होते. तशी स्थिती आता शिंदे – फडणवीस सरकारमध्ये राहिलेली नाही. अजितदादा आता शिंदे – फडणवीस यांचे ज्युनियर बनले आहेत. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या 4500 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि त्या त्याचवेळी केलेला 1500 कोटी रुपयांचा निधी वाटप यावर शिंदे – फडणवीस यांची देखरेख राहिली.
पण अजितदादांनी राष्ट्रवादीच्याच आमदारांना झुकते माप दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. जयंत पाटलांनी अजित पवारांनी केलेल्या निधी वाटपावर समाधान व्यक्त केले. त्याच्याही वेगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला. अजितदादांनी फक्त राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी वाटप करण्यात झुकते माप दिलेले नाही, तर त्यांनी शिवसेना – भाजपच्या आणि अन्य पक्षांच्या आमदारांनाही निधी दिला, असा स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला. पण ठाकरे गटाने मात्र अजित पवारांनीच निधी वाटपात अन्याय शिंदे गटावर अन्याय केल्याचा धोशा लावला.
राजकीय विसंगती
यातून एक राजकीय विसंगती तयार झाली. अजित पवार हे ठाकरे मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना त्यांनी शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय केल्याचा आरोप शिवसेनेतूनच झाला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड करताना शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी अजितदादांवरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पण आता मात्र अजितदादा शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात आल्यानंतर ठाकरे गट अजितदादांवर आरोपांची फैर झाडतो आहे आणि तो देखील शिंदे गटातल्या आमदारांवर अन्याय केल्याचा आरोप करतो आहे. ही राजकीय विसंगती समोर आली आहे.
Ajit Dada’s fund distribution under the supervision of Shinde – Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- भाजपा लखनऊमध्ये घेणार पसमंदा परिषद, मुस्लिमांशी करणार चर्चा
- मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी
- तिहार तुरुंगातील चार अधिकारी निलंबित, यासीन मलिकच्या हजेरीबाबत निष्काळजीपणाचा आरोप
- पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्याला 145 आमदार लागतात पण…; हसन मुश्रीफांची टोलेबाजी