मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमचा मोर्चा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबईत ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता 11 आणि 12 डिसेंबर रोजी कलम 144 लागू आहे. याअंतर्गत राजकीय पक्षांच्या रॅली आणि कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. AIMIM Marching Towards Mumbai demanding Muslim reservation, Home Minister Dilip Walse Patil said – do not violate section 144
वृत्तसंस्था
मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमचा मोर्चा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबईत ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता 11 आणि 12 डिसेंबर रोजी कलम 144 लागू आहे. याअंतर्गत राजकीय पक्षांच्या रॅली आणि कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. हा मोर्चा लक्षात घेऊन मुंबईच्या सीमेवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आहे.
एमआयएमचा हा मोर्चा रोखण्याचा आतापर्यंत दोन ठिकाणी प्रयत्न झाला. औरंगाबाद आणि अहमदनगरमध्ये प्रशासनाकडून मोर्चा रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मान्य न करता मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू ठेवले आहेत.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा औरंगाबादच्या आमखास मैदानातून सकाळी ७ वाजता मुंबईच्या दिशेने निघाला. ते सध्या अहमदनगरच्या बायपास रोडने पुण्याकडे निघाले आहेत. मुंबईत कलम 144 लागू झाल्यामुळे पोलिसांकडून मुंबईबाहेरच मोर्चा रोखण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
AIMIM Marching Towards Mumbai demanding Muslim reservation, Home Minister Dilip Walse Patil said – do not violate section 144
महत्त्वाच्या बातम्या
- वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!
- CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार
- आपला तिरंगा नेहमीच उंच राहील, सीडीएस बिपिन रावत यांनी येथूनच घेतले प्रशिक्षण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे उत्तराखंडमध्ये संबोधन
- नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी