भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांकडे सपूर्द केली चावी
प्रतिनिधी
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर १९८१पासून दिगंबर व श्वेतांबर समुदायांमधील मंदिराच्या मालिकीच्या वादावरून कुलूप बंद होते. मात्र या मंदिराचे कुलूप उघडून मंदिरातील पार्श्वनाथांच्या मूर्तीला लेप करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी रोजी दिल्यानंतर, अखेर काल ११ मार्च रोजी तब्बल ४२ वर्षांनी या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. After almost 42 years the doors of Antarika Parshwanath temple in Washim opened
पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी ९८ वर्षीय साकरचंद शाह यांच्याकडे मंदिराची चावी सुपूर्द केली. यानंतर पोलीस व मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराचे दरवाजे उघडले. ४२ वर्षांनी मंदिर उघडण्यात आल्याने आता मूर्तीची लेप प्रकिया पूर्ण केली जाणार असून, भाविकांना पूजा करता येणार आहे. त्यामुळे समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मुस्लीम देश सूदान मध्ये सापडले तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष!
वाशिम येथील शिरपूर जैन येथे हे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर आहे. या मंदिरावरून दिगंबर जैन व श्वेतांबर जैन पंथांमध्ये वाद होता, त्यामुळे २२ एप्रिल १९८१ रोजी या मंदिराला कुलूप लागले होते. भाविकांना एका छोट्या झरोक्यातून दर्शन घ्यावे लागत होते. दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर प्रखरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते आणि तिथेही अनेक वर्षांपासून त्यावर काहीच निकाल लागला नव्हता. अखेर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे व मूर्तील लेप करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
दिगंबर संस्थानच्या वतीनेही अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचा दरवाजा उघडत असल्याने भाविकांनी दर्शनाला यावे, असे आवाहन करण्यात आले होत. हे मंदिर भाविकांसाठी खुले व्हावे, अशी दोन्हीही पंथांची व संतांची इच्छा होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नव्हता.
After almost 42 years the doors of Antarika Parshwanath temple in Washim opened
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!