विशेष प्रतिनिधी
मुंबई : खोके – बोके थकून गेले, आदित्य ठाकरे चिडून म्हटले, एकनाथ शिंदे मातोश्री वर रडले!! असे महाराष्ट्रात घडले आहे.Aditya Thackeray’s claim of eknath shinde weeping, raised many eyebrows and also important questions
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा केला आहे एकनाथ शिंदे यांना भाजप सरकार जेलमध्ये घालण्याची भीती वाटली आणि ते मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनासाठी सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे समोर आले आहेत. त्यांनी आदित्य यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे. ते स्वाभाविक आहे.
- आदित्य म्हणे, एकनाथ शिंदे रडले; राऊत अंधारे समर्थनासाठी उतरले, पण शिंदे रडलेले 9 महिन्यानंतर आठवले??
पण आदित्य यांच्या दाव्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. ते असे :
- ठाकरे – पवार सरकार जाऊन 9 महिने उलटून गेले आहेत. एकनाथ शिंदे रडले होते, हे या 9 महिन्यांच्या काळात कोणीच कसे सांगितले नाही??
- एकनाथ शिंदे मातोश्री वर येऊन रडल्याची घटना नेमकी केव्हा घडली?? ती कोणासमोर घडली?? ती कोणी पाहिली?? त्या घटनेला साक्षीदार कोण होते??
- मातोश्रीतले सर्व घटक आत्तापर्यंत एवढ्या महत्त्वाच्या विषयावर गप्प का होते??
- शिंदे फडणवीस सरकार आलेला 9 महिने उलटून गेले. दरम्यानच्या काळात आरोप – प्रत्यारोप झाले, तेव्हा एकनाथ शिंदे रडल्याचा राजकीय बॉम्ब गोळा कोणीच का फोडला नाही??
की यामागे आणखी काही वेगळेच राजकीय गुपित आहे??
- खोके – बोके हे आरोप आता निष्फळ ठरल्याने एकनाथ शिंदे रडल्याचा नवा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो आहे का??
- एकनाथ शिंदे यांची प्रतिमा महाराष्ट्रात हळूहळू एक काम करणारा कणखर मुख्यमंत्री अशी बनत चालली आहे का??
- ते भाजपच्या प्रभावाखालचे नेते आहेत, पण तरी देखील तेच आपले स्वतंत्र अस्तित्व ठळक करत चालले आहेत, हे आता दिसून येत आहे का??
- त्यातून आदित्य ठाकरे यांच्या मनात स्वतःच्या राजकीय भवितव्याविषयी असुरक्षितता निर्माण झाली आहे का??
- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही गट नजीकच्या भविष्यात एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा दोन्ही गटांच्या अंतर्गत वर्तुळात होत असतात. या चर्चांना खोडा घालून आदित्य ठाकरे स्वतःचे राजकीय भवितव्य स्वतंत्रपणे सुरक्षित करून घेत आहेत का??
- पहाटेचा शपथविधी हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले गौडबंगाल आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली आहे. पण अजित पवार यांनी बाजू मांडण्यासाठी त्यांच्या दृष्टीने योग्य वेळ यायची आहे. त्यामुळे ते गुढ तोपर्यंत तरी कायम राहणार आहे. मग एकनाथ शिंदे रडले हे असेच राजकीय गुढ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने तयार होत चालले आहे का??
- एकनाथ शिंदे रडले यातून शिंदेंची घाबरट प्रतिमा तयार करण्याचे काम ठाकरे गट करतो आहे का??? सुप्रीम कोर्टाच्या आगामी निकालाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटामध्ये वेगळा मेसेज देऊन संभ्रम तयार करायचा आहे का??
Aditya Thackeray’s claim of eknath shinde weeping, raised many eyebrows and also important questions
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!