• Download App
    आदित्य ठाकरेंना धमकी आली, सरकारने एसआयटीची घोषणा केली!!; विरोधकांनी दारुच्या बाटल्यांची चौकशी "काढली"!! । Aditya Thackeray threatened, government announces SIT !!; Protesters "remove" liquor bottles !!

    आदित्य ठाकरेंना धमकी आली, सरकारने एसआयटीची घोषणा केली!!; विरोधकांनी दारुच्या बाटल्यांची चौकशी “काढली”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना सुशांत सिंग राजपूत हत्याप्रकरणी जीवे मारण्याची धमकी आली. त्याबद्दल कर्नाटकातील एका व्यक्तीला बंगलोरतून अटक झाली. या संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय बाजार गरम झाला असून ठाकरे पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीची घोषणा करून टाकली. Aditya Thackeray threatened, government announces SIT !!; Protesters “remove” liquor bottles !!

    राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा तारा कर्नाटक मध्ये आहेत. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या हत्येचे धागेदोरेही कर्नाटकातच होते. याबाबत तपास करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी विधिमंडळात हा विषय उपस्थित केला. या मुद्द्यावर ताबडतोब ठाकरे – पवार सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकी संदर्भात चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एसआयटी नेमण्याची घोषणा केली.



    त्यानंतर विरोधकांनी ठाकरे – पवार सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पी. ए. मिलिंद नार्वेकर यांना ऑगस्ट 2021 मध्ये धमकी आली होती. त्या धमकीच्या चौकशीचे काय झाले?, मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या, त्या चौकशीचे काय झाले? असे एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून सरकारवर चढाई केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धमकी प्रकरणाचे फक्त राजकारण करायचे आहे, असा आरोप केला. तुमचे सरकार दोन वर्षे सत्तेवर आहे. मग सनातन संस्थेवर कारवाई का केली नाही?, असा सवाल त्यांनी केला.

    या सगळ्या प्रकारात ठाकरे – पवार सरकारचा “पॉलिटिकल प्रॉम्प्टनेस” दिसून आला. आदित्य ठाकरे यांना सकाळी धमकी आली. दुपारी त्या धमकीच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली गेली आहे.

    Aditya Thackeray threatened, government announces SIT !!; Protesters “remove” liquor bottles !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते