विशेष प्रतिनिधी
बीड : अभिनेत्री करीना कपूर- खान हिचे प्रेग्नेंसी बायबल हे पुस्तक आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बायबल हे नाव ख्रिश्चन धर्मीयाच्या जिव्हाळ्याचं असून, त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केला.Actress Kareena Khan Book ‘Pregnancy Bible’ is in controversial debate
ख्रिश्चन महासंघाच्या भूमिकेमुळे त्अभिनेत्री करीना कपूर- खान, आदिती शहा, भीमजानी तसेच प्रकाशक जरनॉट बुक्स यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली असून याप्रकरणी अल्फा ओमेगा महासंघाने अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
- अभिनेत्री करीना कपूरचे प्रेग्नेंसी बायबल वादात
- बायबल हे नाव ख्रिश्चन धर्मीयाच्या जिव्हाळ्याचं
- अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची भूमिका
- गुन्हा दाखल करण्याची मागणी
- शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार
- महासंघाने घेतली अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट
Actress Kareena Khan Book ‘Pregnancy Bible’ is in controversial debate