• Download App
    परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात, 2 कोटींच्या लाचखोरीप्रकरणी एसीबी चौकशीला ठाकरे-पवार सरकरची मंजुरी । Thackeray Governemnt Gives Permission To ACB enquiry of Parambir singh for 2 crore bribe case

    परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात, 2 कोटींच्या लाचखोरीप्रकरणी एसीबी चौकशीला ठाकरे-पवार सरकारची मंजुरी

    ACB enquiry of Parambir singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध एसीबी चौकशीस महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मान्यता दिली. आयुक्तपदावर असताना निलंबित पोलीस अधिकारी अनुप डांगे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. Thackeray Governemnt Gives Permission To ACB enquiry of Parambir singh for 2 crore bribe case 


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध एसीबी चौकशीस महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मान्यता दिली. आयुक्तपदावर असताना निलंबित पोलीस अधिकारी अनुप डांगे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

    पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी असा आरोप केला होता की, त्यांनी परमबीर सिंग यांचे नातेवाईक म्हणून ओळखल्या गेलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याकडे संपर्क साधला. डांगे म्हणाले की, या व्यक्तीने त्यांना मुंबई पोलिसात पुन्हा रुजू होण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. डांगे यांनी महाराष्ट्र गृह खात्याकडे दिलेल्या तक्रारीत परमबीर सिंग यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा आरोपही केला होता.

    सुरुवातीच्या तपासात डांगे यांनी केलेल्या आरोपांमधील सत्यता आढळल्यानंतर एसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली होती.

    पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यकाळात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध गैरप्रकार केल्याबद्दल एफआयआर दाखल झाला आहे. परमबीरसिंग यांना अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही साक्षीदार बनवण्यात आले आहे.

    Thackeray Governemnt Gives Permission To ACB enquiry of Parambir singh for 2 crore bribe case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’