आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.Acharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi
विशेष प्रतिनिधी
नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर संतप्त शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला आणि १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे.
त्याअनुषंगाने पंतप्रधाना दिर्घायुष्य लाभावे यासाठी भाजप अध्यात्मीक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमधील रामकुंडावरील बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप केला.यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तुषार भोसले म्हणाले की ,‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच ‘महामृत्युंजय मंत्रजाप’ करण्यात आला.’ अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे.
Acharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi
महत्त्वाच्या बातम्या
- Goa Assembly Elections : गोव्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक, १४ फेब्रुवारीला मतदान, १० मार्चला निकाल, वाचा सविस्तर…
- कोविड वगैरे काही नाही, ही सगळे भाजपची नाटके; कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार पदयात्रेवर आडले!!
- मोदी – योगींचे उत्तर प्रदेशात १०-१५ दौरे झालेत, प्रश्न उरतो फक्त गरीब पक्षांच्या प्रचाराचा; मल्लिकार्जुन खर्गेंचे टीकास्त्र
- अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस तूर, कपाशीसह पालेभाज्यांच देखील नुकसान