वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटामध्ये एक गॅस टँकर उलटला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai Express Way. Traffic Disturbs
खोपोलीच्या हद्दीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गॅस असलेला ट्रक नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यामुळे मुंबईकडे येणारा मार्ग बंद झाला आहे.
या टँकरमध्ये प्राँपलेन हा अत्यंत ज्वलनशील गॅस आहे. त्यामुळे टँकरच्या परिसरात सुरक्षित अंतर ठेवले असून वाहतूक बंद केली आहे. महामार्ग पोलिस, आय. आर. बी यंत्रणा, देवदूत टीम, खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे.
Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai Express Way. Traffic Disturbs
महत्त्वाच्या बातम्या