• Download App
    येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष |Accident at construction site in Yerwada due to negligence Bluegrass Business Park; Preliminary findings of the expert committee

    येरवड्यात बांधकाम साईटवरचा अपघात निष्काळजीपणामुळे ब्ल्युग्रास बिझनेस पार्क; तज्ज्ञ समितीचा प्राथमिक निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : येरवडा टि.पी. स्कीम फा. प्लॉट नं. ३ पैकी या मिळकती मधील प्लॉट क्र ३ येथील टॉवर ‘बी’ चा अपघात लोखंडी सळईची जाळयांची उभारणी, प्रकल्पाचे डिझाईन नुसार योग्य लोखंडी आधार (Chair) न करता कमी व्यासाची सळई वापरून योग्य रित्या आधार न दिल्याने झाला. ड्रॉईगचा योग्य अभ्यास न करता लोखंडी जाळ्यांची उभारणी कामात योग्य नियंत्रण, समन्वय व आवश्यक तपासणी न करता निष्काळजीपणे केल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे. Accident at construction site in Yerwada due to negligence Bluegrass Business Park; Preliminary findings of the expert committee

    शास्त्रीनगर येरवडा येथील ब्ल्युग्रास बिझनेस पार्क या बांधकाम साईटवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात 7 कामगार मृत्युमुखी तर इतर कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याने पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेततेसाठी जबाबदार असणाऱ्या विविध यंत्रणांच्या अकार्यक्षम असंवेदनशील व भ्रष्ट कारभाराचा मुद्दा समोर आला आहे.



    अपघाताचा विश्लेषणात्मक अभ्यास करून तज्ज्ञ समितीने प्राथमिक निष्कर्ष काढला. बांधकामासाठी बांधलेल्या लोखंडी सळया कोसळून झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने तांत्रिक तथ्य शोध समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या. या बैठका़मध्ये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील परिशिष्ठ ‘क’ विनियम क्र. (सी- ८.५ ) या तरतुदी नुसार प्राथमिक अहवाल सादर करण्याचे
    ठरले.

    त्यानुसार सर्व समिती सदस्यांनी दिलेले प्राथमिक अहवाल विचारात घेवून या अपघाताबाबतचा समितीचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. तसेच समिती मध्ये झालेल्या चर्चे नुसार आवश्यक्ते नुसार तज्ज्ञाची नेमणूक केली जाईल. आवश्यक्ते नुसार सुनावणी घेवून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

    प्रकल्पाच्या राफ्ट फाऊंडेशन बाबतची बांधकाम कार्यपध्दती, जसे की लोखडी जाळीचे ठेवणी व बांधणी योग्य रित्या करण्यात आलेली नाही. तसेच या जाळ्या मधील उभारावयाच्या घोड्या (Chairs) पुरेशा प्रमाणात व आवश्यक आकारमानाच्या स्टीलच्या उभारण्यात आलेल्या नाहीत.सर्वसाधारणपणे या जाळ्याची बांधणी ही या इमारतीच्या स्ट्रक्चरल ड्रॉईगचा योग्य अभ्यास न करता उभारण्यात आल्याचे दिसून येते. या राफ्ट फाऊंडेशनच्या उभारणी बाबत योग्य तांत्रिक तपासणी झाली नसल्याचे देखील आढळून आले आहे.

    या व्यतिरिक्त या अपघातग्रस्त जागेकडे जाण्याच्या रस्त्याला देखील आवश्यक ते संरक्षक कठडे आढळून आले नाही. तसेच राफ्ट मधील सळया (Dowel bar ) देखील खुल्या सोडल्याचे निदर्शनास आले आहे. वरची जाळी व खालची जाळी मध्ये मनुष्य बळाने काम करावयाचे असताना त्या दोन्ही जाळ्या स्थिर राहण्यासाठी नियोजन , संकल्पन व कार्यान्वता (Design Excution and Monitoring) चा अभाव दिसून येतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

    Accident at construction site in Yerwada due to negligence Bluegrass Business Park; Preliminary findings of the expert committee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस