• Download App
    लंडनहून येऊन तरुणीने कसब्यात बजावला मतदानाचा हक्क; पण राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटलांनी केला गोपनीयतेचा भंग!!A young woman came from London and exercised her right to vote in the village

    लंडनहून येऊन तरुणीने कसब्यात बजावला मतदानाचा हक्क; पण राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटलांनी केला गोपनीयतेचा भंग!!

    प्रतिनिधी

    पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अतिशय चुरशीची बनलेली असताना तेथे संथ गतीने मतदान सुरू आहे. कसब्यात तर आरोप – प्रत्यारोपांनी शिखर गाठले होते. त्यात मुसलमानांचे 100 % मतदान घडविण्याचे आवाहन करताना लोकांना परदेशातून बोलवून घ्या. कब्रस्तानातून आणा आणि मेलेल्यांचे मतदान घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. A young woman came from London and exercised her right to vote in the village

    या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघात मतदान होत आहे. कसब्यातल्या मतदानात एका तरुणीने थेट लंडन होऊन पुण्यात येऊन आपला हक्क बजावला आहे. अमृता देवकर असे या तरुणीचे नाव असून ती मँचेस्टर मधून पुण्यात आली आहे आणि ती कसब्याची मतदार असल्याने तिने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

    पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसब्यातल्या स्थानिक नेत्या रूपाली ठोंबरे पाटलांनी मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावरचा आपला रवींद्र धंगेकरांना मतदान केल्याचा फोटो ट्विट करून गोपनीयतेचा भंग केला आहे. याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    A young woman came from London and exercised her right to vote in the village

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?