• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने घेतली अण्णा हजारेंची भेट । A delegation of ST employees called on Anna Hazare

    एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने घेतली अण्णा हजारेंची भेट

    राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. A delegation of ST employees called on Anna Hazare


    विशेष प्रतिनिधी

    राळेगणसिद्धी : मागील काही दिवसांपासून विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे.

    शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असताना आडमुठे धोरण स्वीकारून हा संप अधिक वाढवू नये असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे.



    दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी आपला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर आणखी दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही.

    सरकार पडेल, असा दबाव आणला तरच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या आंदोलनाचा प्रश्न अजून गंभीर होत चालला आहे.

    A delegation of ST employees called on Anna Hazare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी