विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप ७५ हजार पत्र लिहिणार आहे. या पत्रांच्या माध्यमातून भाजप ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुन देणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.75,000 letters will be sent To Chief Minister Uddhav Thackeray
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील विधानाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.बावनकुळे म्हणाले, वर्षा बंगल्यावर जागा राहणार नाही, एवढी पत्र भाजप उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्रे
- भाजपची आता राबविणार स्मरण मोहीम
- नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर उपक्रम
- वर्षा बंगला आता स्मरण पत्रांनी भरून जाणार