• Download App
    महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी5400 cr pakage for maharashtra; CM uddhav thackeray appeals to PM for medical help from the centre

    महाराष्ट्रात ५४०० कोटींचे पॅकेज; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक स्वरूपाची मदत देण्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांकडे मागणी

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५४०० कोटी रूपये खर्चाचे राज्याचे पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर कोविडला नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून लोकांना वैयक्तिक मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. 5400 cr pakage for maharashtra; CM uddhav thackeray appeals to PM for medical help from the centre

    • राज्य सरकारमधून अन्नसुरक्षा प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत. ७ कोटी नागरिकांना लाभ.
    • शिवभोजन थाळी महिनाभर मोफत देणार. दोन लाख थाळ्या देणार. रोजी मंदावली तरी रोटी थांबू देणार नाही.
    • केंद्र – राज्यांच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना १००० रूपये आधीच देणार. ३५ लाख लोकांना याचा थेट फायदा.
    • नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १५०० रूपये देणार. घरेलू कामगारांना १५०० रूपये देणार
    • अधिकृत नोंदणीकृत फेरीवाले १५०० रूपये. ५ लाख लाभार्थी. परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रूपये देणार. १२ लाख लाभार्थी.
    • आदिवासी खावटी कर्ज १२ लाख लाभार्थी. २००० रूपये देणार.
    • ३३०० कोटी रूपये फक्त कोविडसाठी राखून ठेवले आहे.
    • एकूण ५४०० कोटी रूपये खर्च करून जनतेला आधार देण्यासाठी बाजूला काढतोय.
    • रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. याचा पुरवठा कमी पडून देणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा इतर राज्यांतून आणण्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी दिली आहे. तो ईशान्येकडील राज्यांतून आणण्यासाठी विनंती पंतप्रधानांना केली आहे. हवाई वाहतूकीने एअर फोर्सला सांगून ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे. त्यांना पत्र लिहून फोन करेन.
    • उद्योदक, व्यावसायिक यांना जीएसटी परतावा मुदत तीन महिने वाढविण्याची पंतप्रधानांना मागणी.
    • कोरोना नैसर्गिक आपत्ती समजून संकटातील लोकांना वैयक्तिक मदत देण्याची पंतप्रधानांना मागणी.

    5400 cr pakage for maharashtra; CM uddhav thackeray appeals to PM for medical help from the centre

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!