विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – चक्रीवादळामुळे गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये मिळून ४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक हानी अमरेली जिल्ह्यात झाली असून येथे १५ जणांना प्राण गमवावे लागले. गीर सोमनाथ आणि भावनगर जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आठ जणांचा मृत्यू झाला, तर अहमदाबादमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले. एकूण मृतांपैकी २४ जणांचा मृत्यू भिंत कोसळल्याने झाला, तर अंगावर झाड कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. 45 died due to cyclone in Gujrath
गुजरातमध्ये खेडा, आणंद, सूरत, नवसारी, सोमनाथ, भावनगर, साबरकंठा येथे गेल्या २४ तासांमध्ये १०० मिमी पाऊस कोसळला. चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले असून पुढील काही दिवस सेवा पूर्ववत करण्यातच जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले आहे.
आता तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे आता कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाले असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. राजस्थानच्या दक्षिण भागावर हा पट्टा तयार झाला आहे. वादळाच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवसांत राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या दोन दिवसांत वाऱ्यांचा ताशी वेग ४५ ते ५५ किमी इतका असेल. राजस्थानच्या दक्षिणेकडे आजही मुसळधार पाऊस कोसळला.
45 died due to cyclone in Gujrath
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Tauktae : पीएम मोदींनी गुजरातसाठी जाहीर केली 1000 कोटी रुपयांची मदत, मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची भरपाई
- पीएम मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कोविड व्यवस्थापनावर व्यक्त केले समाधान, म्हणाले- असेच काम करत राहा!
- Indian Railway Recruitment : रेल्वेत 10वी पाससाठी 3591 रिक्त पदे, विना परीक्षा होणार भरती
- Congress Toolkit Leak : संबित पात्रांनी पुराव्यानिशी सांगितले कोणी बनवली टूलकिट! काँग्रेसने भ्रम पसरवल्याचा आरोप
- नव्या व्हेरिएंटवरील केजरीवालांच्या ट्वीटने वादाचे मोहोळ, सिंगापूर सरकारने भारतीय उच्चायुक्तांसमोर नोंदवला आक्षेप