विशेष प्रतिनिधी
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आत्तापर्यंत बरेच वेगवेगळे प्रयोग झाले. परंतु असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच होत आहे. काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित तसेच एस. एन. प्रोडक्शन सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ या बिग बजेट चित्रपटाची सोशल मिडीयावर घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. चित्रीकरणाचा मुहुर्त सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. २०२२ मध्ये दिवाळीला हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
1st time ever in the history of Marathi film industry. A musical film never witnessed before.
संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील व सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये सुमारे तीस गाणी असणार आहेत. या चित्रपटाला अमितराज व पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. असा प्रयोग मराठीमध्ये पहिल्यांदाच होत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यात चाकू हल्ला
अभिनेता सचित पाटील या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहे. सचित पाटील व नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आपल्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाविषयी भावना व्यक्त करताना सचित पाटील म्हणतो, ‘निर्मिती क्षेत्रामधील पदार्पणासाठी आम्ही एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होतो. आणि ‘तमाशा लाईव्ह’ सारखा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आम्हाला करायला मिळतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पसंत पडेल’.
1st time ever in the history of Marathi film industry. A musical film never witnessed before
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप