corona infected : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आज नवी मुंबईतील घणसोली येथील शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यांना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते आठवी ते अकरावीपर्यंतचे विद्यार्थी असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 16 students corona infected in Navi Mumbai amid threat of Omicron, father of a child who had returned from Qatar
वृत्तसंस्था
मुंबई : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आज नवी मुंबईतील घणसोली येथील शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यांना स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते आठवी ते अकरावीपर्यंतचे विद्यार्थी असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
विद्यार्थ्याचे वडील 9 डिसेंबर रोजी कतारहून परतले होते. यातील एका विद्यार्थ्याचे वडील 9 डिसेंबर रोजी कतारहून परतले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ते घणसोली येथील गोठीवली येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि त्यांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र त्यांच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शाळेत इयत्ता 11वीत शिकणार्या त्यांच्या मुलाला संसर्ग झाल्याचे आढळून आले.
यानंतर संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत 16 विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, “गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत शाळेतील 811 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून शनिवारी 600 विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.” या विद्यार्थ्यांना वाशीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल ३७५ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी झाली.
16 students corona infected in Navi Mumbai amid threat of Omicron, father of a child who had returned from Qatar
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातले नेते केंद्रात सहकाराबद्दल भरभरून “बोलले”; पण सहकाराविषयी “केले” काहीच नाही; राधकृष्ण विखे-पाटलांचे पवारांवर शरसंधान
- महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!!
- पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार ; हल्ल्यात तरुण जखमी
- मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न – जयंत पाटील
- द कपिल शर्मा शो : ‘ तू मराठी का बोलत नाही?’ ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले