• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड|112 crore for ST employees salaries; decision of Deputy Chief Minister Ajit Pawar ahead Of Diwali Festival

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे112 crore for ST employees salaries; decision of Deputy Chief Minister Ajit Pawar ahead Of Diwali Festival

    निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि.26) दिले. त्यानुसार तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.



    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे.

    कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली.

    या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

    112 crore for ST employees salaries; decision of Deputy Chief Minister Ajit Pawar ahead Of Diwali Festival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!