• Download App
    ऑनलाईन परीक्षेसाठी दहावी, बारावीचे विद्यार्थी मुंबईसह इतर शहरांमध्ये रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार!!; हिंदुस्थानी भाऊवर ठपका|10th, 12th class students for online exams on the streets in Mumbai and other cities, police beatings !!; Blame on Hindustani brother

    ऑनलाईन परीक्षेसाठी दहावी, बारावीचे विद्यार्थी मुंबईसह इतर शहरांमध्ये रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार!!; हिंदुस्थानी भाऊवर ठपका

    प्रतिनिधी

    मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत, तर त्या ऑनलाईनच घेण्यात याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेले दिसले. मुंबई, अकोला, नागपूर, औरंगाबाद, लातूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.10th, 12th class students for online exams on the streets in Mumbai and other cities, police beatings !!; Blame on Hindustani brother

    मुंबईत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानासमोर हजारो विद्यार्थ्यांनी जमून मोठे आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर लाठीमार केला. या लाठीमारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून पोलीस याबाबत हिंदुस्थानी भाऊ नावाच्या सोशल मीडिया हँडलरला दोषी ठरवताना दिसत आहेत.



    टीव्ही नाईन वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार हिंदुस्तानी भाऊ विकास पाठक याला पोलिसांनी धारावीतून बाजूला काढले. तो विद्यार्थ्यांचे नेतृत्व आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. परंतु, हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक याला आंदोलन स्थळापासून बाजूला केल्यानंतरच विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आहे.

    आता विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाला असून पोलिसांना आंदोलनाची पूर्वकल्पना कशी काय नव्हती?, अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलीस लाठीमार कसे करू शकतात?, यामागे नेमके कोणाचे आदेश आहेत?, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. तर ठाकरे – पवार सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मागे अन्य कुणी समाजकंटक आहेत का?, याचा तपास केला जाईल, असे म्हटले आहे.

    शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्यावात किंवा कसे याचा आढावा 15 फेब्रुवारी नंतर घेण्यात येईल, असे म्हटले होते. याच मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढला. शिक्षण ऑनलाइन झाले आहे तर परीक्षा ऑनलाईनच घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती.

    हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक याला पोलिसांनी बाजूला केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणी मध्ये हिंदुस्थानी भाऊला सोडा, अशी भर पडली. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेच्या मागणीपेक्षा त्यांच्यावर झालेला लाठीमार आणि हिंदुस्थानी भाऊ या विषयावर आता सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनी लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामाग समाजकंटक असल्याचा दावा केला आहे. यावरून मोठ्या प्रमाणावर राज्य राजकीय धमासान सुरू झाले आहे.

    10th, 12th class students for online exams on the streets in Mumbai and other cities, police beatings !!; Blame on Hindustani brother

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस