विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेसाठी १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. 100 crore fund for one-time benefit scheme for Anganwadi workers and helpers Approval given by Chief Minister Uddhav Thackeray
यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती,राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे.
अशा एक रकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरीता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्यासाठी हा निधी मिळावा असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने सादर केला होता. या प्रस्तावाला ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत मान्यता दिली.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे असे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.
100 crore fund for one-time benefit scheme for Anganwadi workers and helpers Approval given by Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Raut – Somaiya : संजय राऊतांनी स्वीकारले “मौन”; किरीट सोमय्या म्हणतात, नव्हे, ही तर झाली “बोलती बंद”!!
- The Kashmir Files : काश्मीर मध्ये “त्यावेळी” जे झाले ते विसरून समाजात एकता टिकवावी; शरद पवारांचे वक्तव्य
- इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगीच्या चौकशीचे आदेश पुण्यातील घटनेचे दिल्लीत पडसाद
- कात्रज मध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट