विशेष प्रतिनिधी
मुबंई : गगनभेदी वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर याविरूद्ध कॉंग्रेसने केंद्र सरकारविरुद्ध मुंबईमध्ये काल विरोधी माेर्चा काढला हाेता. दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानापासून शिवाजी पार्कमधील चैतन्य भूमिपर्यंत पदयात्रा काढून हा निषेध करण्यात आला होता.
Zeeshan Siddiqui wrote a letter to Congress President Sonia Gandhi and lodged a complaint against Mumbai Congress President Bhai Jagtap
तर यावेळी मुंबई काँग्रेसचे यूथ विंगचे अध्यक्ष आणि विधायक झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार केली आहे. झीशान सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार, या पदयात्रेत भाई जगताप यांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जातीबद्दल अपमानजनक शब्द वापरले. त्यामुळे भाई जगताप यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
काँग्रेसमधील या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेसमध्ये फूट पडत आहे असे चित्र उभे राहिले आहे.
Zeeshan Siddiqui wrote a letter to Congress President Sonia Gandhi and lodged a complaint against Mumbai Congress President Bhai Jagtap
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा