ज्यात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वच राजकीय पक्षांची सहमती असूनही हा विषय पुढे गेलेला नाही. कोरोना काळात हा विषय मागे पडला. आता छत्रपती शिवरायांचे वंशज खा. संभाजीराजे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर त्यांनी गुजरातेतील स्टॅच्यू ऑफ युनिटीचा संदर्भ देत असा सवाल केला आहे. Yuvraj Sambhaji Raje Chhatrapti Visit Statue Of Unity In Gujrat
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वच राजकीय पक्षांची सहमती असूनही हा विषय पुढे गेलेला नाही. कोरोना काळात हा विषय मागे पडला. आता छत्रपती शिवरायांचे वंशज खा. संभाजीराजे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर त्यांनी गुजरातेतील स्टॅच्यू ऑफ युनिटीचा संदर्भ देत असा सवाल केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रलंबित शिवस्मारकाचा उल्लेख आपल्या ट्वीटमध्ये केलेला नसला तरी त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचे बोलले जात आहे.
आपल्या ट्वीटमध्ये खा. संभाजीराजे म्हणाले की, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या स्मारकास भेट दिली. श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचं कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?
ते पुढे म्हणाले की, हे स्मारक साकारण्यासाठी गुजरात सरकारने मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, हे इथे आल्यावर जाणवते. इतके भव्य दिव्य स्मारक गुजरात सरकारने केवळ पाच वर्षांत बांधून पूर्ण केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.”
खा. संभाजीराजे यांच्या या ट्वीटवर असंख्य प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक हा तमाम मराठी जनांच्या नव्हे, तर देशवासीयांच्या अभिमानाचा विषय आहे. यामुळे वेळोवेळी यावरून प्रतिक्रिया उमटत राहतात. परंतु, काही राजकीय सोपस्कार सोडले तर प्रत्यक्षात पुढे काहीच झालेले नाही. यामुळेच या स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी सर्वांच्या मनातली इच्छाच खा. संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे.
Yuvraj Sambhaji Raje Chhatrapti Visit Statue Of Unity In Gujrat
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली