• Download App
    तुमची सुपारी घेतली, उडवण्यापूर्वी कल्पना देण्याची माझी पद्धत; भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक|Youth Arrested From Navi Mumbai For Threatning Chhagan Bhujbal On Phone

    तुमची सुपारी घेतली, उडवण्यापूर्वी कल्पना देण्याची माझी पद्धत; भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

    प्रतिनिधी

    नाशिक : मागच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या प्रशांत पाटील या तरुणास नवी मुंबई येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. छगन भुजबळ यांना या तरुणाने धमकी दिली होती. त्यानंतर भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.Youth Arrested From Navi Mumbai For Threatning Chhagan Bhujbal On Phone



    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री भुजबळ यांना मोबाइलवर एक फोन आला होता. त्यात तुमची मी सुपारी घेतली असून जीवे मारण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कल्पना देण्याची माझी पद्धत आहे, असे सांगत भुजबळ यांना धमकवण्यात आले. त्यांनी तातडीने पुणे पोलिस तसेच सीआयडीला या संदर्भामध्ये कळवले. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवून संबंधित तरुणाला नवी मुंबईतून अटक करण्यात आली.

    संशयित कोल्हापुरातून रातोरात नवी मुंबईत

    प्राथमिक तपासात हा युवक एका खासगी ठिकाणी नोकरीला असून त्याने भुजबळ यांचा मोबाईल क्रमांक गुगलवर सर्च करून मिळवला असे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर येथून तो रातोरात नवी मुंबई येथे कसा पोहोचला याचाही तपास पोलीस पुढे करत आहेत.

    Youth Arrested From Navi Mumbai For Threatning Chhagan Bhujbal On Phone

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ