• Download App
    महाराष्ट्रात तरुणाईला ग्रासले कोरोनाने, ३१ ते ४० वयोगटाला सर्वाधिक संसर्ग |Youngsters caught in the trap of corona

    महाराष्ट्रात तरुणाईला ग्रासले कोरोनाने, ३१ ते ४० वयोगटाला सर्वाधिक संसर्ग

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक २१.६ टक्के संसर्ग ३१-४० वयोगटातील व्यक्तींना झाला आहे. त्या खालोखाल ४१-५० वयोगटाचे १८.३ टक्के आणि २१-३० वयोगटाचे १६.४ टक्के रुग्ण आढळले आहेत. ११ टक्के बाधित हे २० वर्षांहून कमी वयाचे आहेत.Youngsters caught in the trap of corona

    राज्यात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण सारखे आहे; मात्र दीर्घकालीन आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाचा अधिक त्रास झाला. २१ ते ५० वयोगटातील व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर जातात. त्यामुळे त्यांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.



    त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी ३.२३ लाख ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला होता; तर यावर्षी केवळ ३ महिन्यांत ३.२७ लाख ज्येष्ठ नागरिक कोरोनामुळे बाधित झाले आहेत.

    गेल्या वर्षी ६० वयोगटावरील व्यक्तींच्या बाधित होण्याचे प्रमाण १५.९४ टक्के होते. या वर्षी केवळ जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात १६.४ टक्के ज्येष्ठ नागरिक बाधित झाले; तर मार्चमध्ये हे प्रमाण १८ टक्क्यांवर गेले. २०२० मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण ५७.५१ टक्के होते.

    यावर्षी हे प्रमाण ६४.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान राज्यात २,२४२ मृत्यू झाले. त्यात ज्येष्ठांची संख्या १,४४९ होती. इतर नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्युदर अधिक आहे.

    Youngsters caught in the trap of corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!