• Download App
    सुगंध, रंग आणि बरंच काही! असा ओळखा अस्सल हापूस | You can find original Alphonso Mango with these tricks

    WATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही! असा ओळखा अस्सल हापूस

    प्रत्येक ऋतूचं एक वैशिष्ट्य असतं आणि आपल्या काही आवडीनिवडी त्याच्याशी जोडलेल्या असतात. पण उन्हाळा हा एक असा ऋतू आहे जो एका कारणासाठी जवळपास प्रत्येक व्यक्तीलाच आवडत असावा. हे कारण म्हणजे फळांचा राजा आंबा. उन्हाळ्यामध्ये आंबा बाजारात येतो. आंबा आवडणार नाही असा व्यक्ती क्वचितच सापडतो. त्यामुळं आंब्यासाठी लहान-मोठे सर्वच उन्हाळ्याची आवर्जुन वाट पाहत असतात. आता आंबा म्हटलं तर त्याचेही अनेक प्रकार भौगोलिक परिस्थितीनुसार पाहायला मिळतात. पण जगभरात आंब्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कोकणचा हापूस (Alphonso Mango) आंबा. बाजारात आपल्याला अनेक ठिकाणी हापूस आंबा विकत मिळत असतो. पण तो खरंच कोकणातला हापूस असतो का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अनेकदा स्थानिक परिसरात पिकणारा हापूस आंबादेखिल कोकण हापूस म्हणून विकला जातो. अनेक ग्राहक त्याची खरेदी करतात. पण चव सर्वकाही सांगून जाते. मात्र खाण्याच्या आधीच अस्सल हापूस कसा ओळखायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

    हेही पाहा – 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!