• Download App
    Yesterday Chandrakantdada's "will know in two days"; My "future colleague" exclamation of the Chief Minister today; What is Gaudbengal ??

    काल चंद्रकांतदादांचे “दोन दिवसात कळेल”; आज मुख्यमंत्र्यांचे माझे “भावी सहकारी” उद्गार; काय आहे गौडबंगाल??

    विशेष प्रतिनिधी

    संभाजीनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात काढलेल्या राजकीय उद्गारांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर असलेल्या नेत्यांकडे वळून “माझे आजी माजी सहकारी तसेच एकत्र आले तर भावी सहकारी”, असे संबोधून भाषणाला सुरुवात केली. Yesterday Chandrakantdada’s “will know in two days”; My “future colleague” exclamation of the Chief Minister today; What is Gaudbengal ??

    त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. कारण त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि भागवत कराड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे शिवसेना – भाजपा पुन्हा एकत्र येण्याची ही नांदी तर नाही ना..??, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कालच सारखे “माजी मंत्री – माजी मंत्री” म्हणून काय उल्लेख करता…?? दोन दिवसात तुम्हाला कळेलच “माजी की भावी” ते असे उद्गार पुण्यातल्या एका कार्यक्रमात काढले होते. त्यावेळी देखील शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.

    चंद्रकांतदादांच्या या विधानानंतर आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर व्यासपीठावर भाजपचे दोन केंद्रीय मंत्री उपस्थित असताना “माझे भावी सहकारी” असा आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उल्लेख केल्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना अधिकच पुष्टी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    Yesterday Chandrakantdada’s “will know in two days”; My “future colleague” exclamation of the Chief Minister today; What is Gaudbengal??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Raj Thackeray जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले; राज ठाकरेंनी टाइम्स सकट मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले!!