• Download App
    होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, संजय राऊत यांनीच मान्य केले|Yes, Shiv Sena does bullying, we are certified goons, Sanjay Raut agreed

    होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, संजय राऊत यांनीच मान्य केले

    होय, शिवसेना गुंडगिरी करते.आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही’ असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.Yes, Shiv Sena does bullying, we are certified goons, Sanjay Raut agreed


    मुंबई : होय, शिवसेना गुंडगिरी करते.आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही’ असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

    बुधवारी मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आहे. शिवसेनेकडून गुंडगिरी केली जात असल्याची टीका केली जात आहे.



    यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. तसेच शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही.

    राऊत म्हणाले, शिवसेना गुंडगिरी करते, मात्र याला सत्तेचा माज म्हणणे हे चुकीचे आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेने कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत

    गुंडगिरी म्हणत असाल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकलेला आहे, त्या वास्तूच्या दिशेने कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली. यामुळेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे.

    Yes, Shiv Sena does bullying, we are certified goons, Sanjay Raut agreed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!