विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा विश्वविक्रम करण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ परिवार, हार्ट फुलनेस संस्था आणि नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन (एनवायएसएफ) या पाच संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम होत आहे. आयुष मंत्रालय, क्रीडा मंत्रालय सहकार्यास तयार झाले आहे. तर शिक्षण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, संरक्षण मंत्रालयांना या उपक्रमात जोडून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. World record of 75 crore sun masks on the occasion of Independence Day; Register to do so
१४ जानेवारी ते रथसप्तमी म्हणजे ७ फेब्रुवारीपर्यंत देशातील सर्व राज्यांत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक सहभागीला २१ दिवस १३ सूर्यनमस्कार करायचे आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.75suryanamaskar.com या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. नोंदणी वैयक्तिक आणि संस्थांचीही होऊ शकते. ३० हजार शिक्षण संस्था, ३० लाख योगसाधक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
World record of 75 crore sun masks on the occasion of Independence Day; Register to do so
महत्त्वाच्या बातम्या
- देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 358 नवे रुग्ण , आतापर्यंत 653 जणांना ओमिक्रॉनची लागण
- WATCH : स्थापना दिनीच पडला काँग्रेसचा झेंडा, पक्ष कार्यालयात झेंडा फडकावताना सोनिया गांधींनी दोरी ओढताच निसटला
- लसीचे दोन्ही डोस घेऊनही BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचे; आक्रमक पत्र मुख्यमंत्र्यांचे; “सावध” आडकाठी राष्ट्रवादीची!!