• Download App
    Women power in maharashtra leads mahayuti victory महाराष्ट्रात महिलाच

    महाराष्ट्रात महिलाच ठरल्या खऱ्या पुरोगामी; फुले, शाहू, आंबेडकरांचा नुसता जप केला नाही, की…!!

    mahayuti victory

    नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात महिला पहिल्यांदाच ठरल्या “गेमचेंजर”, त्या खरंच पुरोगामी ठरल्या. कारण त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर नावाचा नुसता पोकळ जप केला नाही. त्या शरद पवारांच्या जात वर्चस्वाच्या अजेंड्यात अडकल्या नाहीत, की काँग्रेसच्या 3000 रुपयांच्या खटाखटला भूलल्या नाहीत. मतदानातल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले. उलट महाराष्ट्रातल्या महिलांनी जाती वर्चस्वाचा अजेंड्याच्या पलीकडे जाऊन मतदान केलं.Women power in maharashtra leads mahayuti victory

    शरद पवार आणि काँग्रेस यांनी महाराष्ट्रातून निवडणूक जात वर्चस्वाच्या अजेंड्यावर नेण्याचे खूप प्रयत्न केले. मनोज जरांगे + मौलाना सज्जाद नोमानी नावाची राजकीय बुजगावणी उभी केली आणि नंतर खाली पण बसवली. पवारांनी आणि त्यांच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरातल्या राज्यशास्त्रीय बौद्धिक प्राध्यापकी मुखंडांनी पवारांच्या जात वर्चस्वाच्या अजेंड्याला पुरोगामी रंगरंगोटी देखील केली. पण महाराष्ट्रातल्या महिला मतदारांनी मतदार यंत्रातून असा काही दणका दिला, की त्यांनी पवार + ठाकरे आणि काँग्रेसचे तारे जमिनीवर आणले. यासाठी महिलांनी फुले, शाहू, आंबेडकर असा पुरोगामी जप बिलकुल केला नाही. त्यांनी फक्त एकजुटीने मतदान यंत्रावरची बटणे दाबली. त्यांनी घरातला पुरुषी वर्चस्वाचा काही ठिकाणी दबाव देखील झुगारला.



    पुरोगामी जपातले ढोंग

    पवार आणि काँग्रेसच्या फुले, शाहू, आंबेडकरांचा आंबेडकरांच्या पुरोगामी जपातला ढोंगीपणा इतर कुणी नव्हे, पण महाराष्ट्रातल्या महिलांनी बरोबर ओळखला. मुखी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव आणि मनात जात वर्चस्वाचा डाव, हे शरद पवार आणि काँग्रेसचे वैशिष्ट्य महाराष्ट्राल्या महिलांनी बरोबर ओळखले. त्यासाठी त्यांना टिळक पगडी विरुद्ध फुले पागोटे असला वाद घालावा लागला नाही.

    सर्व स्तरातल्या महिलांनी पुढे येऊन मतदानाचा टक्का वाढवला. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळीकडे महिलांनी मतदानाचा विक्रम केला. या वाढीव टक्क्याचा महायुतीला फायदा आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.

     लाडकी बहीण योजनेला भूलल्याचे अर्धसत्य

    महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला भुलून महिलांनी मतदानाचा टक्का वाढविला, असे मानणे देखील अर्धसत्य ठरेल. कारण महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पहिल्यांदी 1500 रुपये दिले आणि जाहीरनाम्यात 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्या तुलनेत काँग्रेसने जाहीरनाम्यात महिलांना 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण महिलांनी महायुती सरकारवर विश्वास ठेवला, परंतु काँग्रेसच्या विशेषतः राहुल गांधींच्या खटाखट 3000 रुपयांवर विश्वास ठेवला नाही. याला कारण कर्नाटक, हिमाचल सारख्या राज्यात काँग्रेसला आपली आश्वासने टिकवता आली नाहीत. याचा सुशिक्षित महिलांवर परिणाम झाला. त्यांनी काँग्रेसी आश्वासनांची पोकळ विश्वासार्हता ओळखली. महिलांनी काँग्रेस आणि पवारांना तर धक्क्याला लावलेच, पण ठाकरेंनाही त्यांनी सोडले नाही. उबाठा शिवसेनेलाही चांगला दणका दिला.

    Women power in maharashtra leads mahayuti victory

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस