• Download App
    पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी घातली कांग यास्ते शिखराला गवसणी, महाराष्ट्रातील महिलांची पहिलीच यशस्वी मोहीम|Women mountaineers from Pune reach the Kang Yaste, the first successful expedition of women in Maharashtra

    पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी घातली कांग यास्ते शिखराला गवसणी, महाराष्ट्रातील महिलांची पहिलीच यशस्वी मोहीम

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील गिरीप्रेमी क्लबच्या महिला गिर्यारोहकांच्या पथकाने हिमालयातील कांग यास्ते १ आणि कांग यास्ते 2 नावाच्या सहाज हजार फुटाच्या शिबिराला गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातील महिलांची ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे.Women mountaineers from Pune reach the Kang Yaste, the first successful expedition of women in Maharashtra

    प्रियंका चिंचोरकर, स्मिता करीवाडीकर, पद्मजा धनवी, स्नेहा गुडे, सायली बुधकर, अंजली कात्रे यांनी या मोहिमेत भाग घेतला. समीर कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संघाला प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रख्यात गिर्यारोहक श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे गेल्या दोन वर्षांपासून महिला संघाला मार्गदर्शन करत आहेत.



    झिरपे यांनी सांगितले की, संघाचे दोन भाग करण्यात आले. प्रियांका चिंचोरकर आणि स्मिता करीवाडीकर यांचा समावेश असलेल्या पहिल्या संघाने प्रतिकूल हवामान परिस्थितीत चढण्यासाठी सर्वात कठीण शिखरांपैकी एक असलेल्या कांग यत्से -1 (६४९४ फुट) हे शिखर सर केले. या दोघांसोबत समीरन कोल्हे होत.

    धनवी, गुडे, बुधकर आणि कात्रे यांचा समावेश असलेल्या इतर संघाने कांग यत्से -2 (6270 मी) हे शिखर पादाक्रांत केले. यामध्ये ५१ वर्षांच्या अंजली कात्रे या गिर्यारोहक होत्या. पद्मजा धनवी पहिल्या प्रयत्नात शिखर सर करू शकल्या नाहीत. त्यांनी ४ आणि ५ ऑगस्ट रोजी मोहीमेच्या प्रमुख प्रियंका चिंचोरकर यांच्यासह शिखर सर केले.

    कांग यात्से शिखर समूह लडाखमधील मरखा व्हॅलीच्या अगदी टोकाला आहे. कांग यत्से -1 उंची 6,494 मीटर उंच आहे, तर कांग यातसे -2 ची उंची 6,270 मीटर आहे. कांग यत्से -1 शिखर हे चढाईसाठी सर्वात कठीण शिखरांपैकी एक मानले जाते. या मार्गावर ठिसूळ खडक आहेत आणि खडी चढण थकवणारी आहे. गियार्रोहकांच्या क्षमतेची परीक्षा घेणरी ही चढण आहे.

    गिरिप्रेमीच्या संस्थापक अध्यक्ष उषाप्रभा पागे यांनी सांगितले की, रॉक क्लाइंबिंग आणि गिर्यारोहण मोहिमांसह मुलींनी ट्रान्स हिमालयन ट्रेकचेही ध्येय ठेवले पाहिजे.झिरपे यांनी सांगितले की, आम्ही मोहीमेची घोषणा सुरू केली आणि कोरोना महामारी सुरू झाली. या कठीण काळात, एकत्र येणे आणि दुहेरी मोहिमेची तयारी करणे जवळजवळ अशक्य होते.

    म्हणून आम्ही डिजिटल मार्ग अवलंबला. गिरीप्रेमींनी फक्त महिला गिर्यारोहकांसाठी गुरुकुल उभारले. संजय साठे यांनी ब्रह्मविद्या सत्रासह संघाला मानसिक तंदुरुस्तीसाठी मदत केली. समीरन कोल्हे यांनी शारीरिक तंदुरुस्तीची काळजी घेतली. गुरुकुलमध्ये १५ पेक्षा जास्त महिला गिर्यारोहकांनी भाग घेतला. आता महिला गिर्यारोहक हिमालयाचे आव्हान पेलण्यास तयार असून एक पथक माऊंट एव्हरेटवर चढाईचे लक्ष्य ठेवले आहे.

    Women mountaineers from Pune reach the Kang Yaste, the first successful expedition of women in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा